मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|मध्वमुनीश्वरांची कविता|
आरती रामाची

आरती रामाची

मध्वमुनीश्वरांची कविता


श्रीरामा जयरामा जयजय श्रीरामा ॥ पतितपावननामा निर्मळ गुणधाम ॥ अवाप्तकामा देऊं कोणाची उपमा ॥ न कळे महिमा निगमा तव मेघश्यामा ॥१॥
जयदेव जयदेव जय सीतारमणा ॥ मंगळ आरति तुजला रविवंशाभरणा ॥ध्रु०॥
शरयूतीरविहारा मणिमुक्ताहारा ॥ जगदाधारा दीनोद्धारा भवपारा ॥ वाणिसी पारावारा न कळे संसारा ॥ उत्तरदेशीं झाला अभिनव अवतारा ॥२॥
वामभागीं सीता विश्वाची माता ॥ दक्षिण भागीं भ्राता बांधुनिया भाता । मध्यें शोभे धाता मुक्तीचा दाता ॥ मध्वमुनीश्वर ताता करितो प्रणिपाता ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : May 28, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP