आरती कृष्णाची
मध्वमुनीश्वरांची कविता
अनंत जन्मीं सुकृत केलें बहु नंदें ॥ म्हणोनि त्याचे द्वारीं रांगसि आनंदें ॥ सुरवर मुनिजन वंदिती पदारविंदें ॥ तो तूं गोवळ होऊनि खेळसी स्वच्छंदें ॥१॥
जयदेव जयदेव जय श्रीगोपाळा ॥ मंगळ आरती तुजला नंदाच्या बाळा ॥ध्रु०॥
नटवर नागर मोहन वृंदा गोविंदा ॥ मुरलीनादें मोहित करिसी गोवृंदा ॥ सुरवर मधुकर होउनी तवपदारविंदा ॥ तन्मय होउनी सेविती चिन्मय गोविंदा ॥२॥
मस्तकीं मुगुट कर्णीं झळकती कुंडलें ॥ कांबळ खांदा पिवळें अंबर गुंडलें ॥ मध्वनाथासंगें स्वरूप दंडलें ॥ दर्शनमात्रें येणें जाणें खंडलें ॥३॥
N/A
References : N/A
Last Updated : May 28, 2017
TOP