मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|मध्वमुनीश्वरांची कविता| पत्रिका भागीरथी ३२ वीं मध्वमुनीश्वरांची कविता गणपतीचीं पदें पद १ ते १० पद ११ ते २० पद २१ ते ३० पद ३१ ते ४० पद ४१ ते ५० पद ५१ ते ६० पद ६१ ते ७० पद ७१ ते ८० पद ८१ ते ९० पद ९१ ते १०० पद १०१ ते ११० पद १११ ते १२४ १ ते ३ पदे १ ते १० पदे ११ ते २० पदे २१ ते ३० पदे ३१ ते ४० पदे ४१ ते ५० पदे ५१ ते ६० पदे ६१ ते ७० पदे ७१ ते ८० पदे ८१ ते ९० पदे ९१ ते १०० पदे १०१ ते ११० पदे १११ ते १२० पदे १२१ ते १३२ पदे १ ते १० पदे ११ ते १९ पदे १ ते ५ पदे १ ते २ परशुरामाचे पद पदे १ ते ५ पदे १ ते ६ पदे १ ते ७ पदे १ ते ११ पदे १ ते १० पदे ११ ते २० पदे २१ ते ३० पदे ३१ ते ४६ पदे १ ते ३ पदे १ ते १० पदे ११ ते २० पदे २१ ते ३० पदे ३१ ते ४० पदे ४१ ते ५० पदे ५१ ते ६० पदे ६१ ते ७० पदे ७१ ते ८० पदे ८१ ते ९० पदे ९१ ते १०० पदे १०१ ते ११० पदे १११ ते १२० पदे १२१ ते १३० पदे १३१ ते १४० पदे १४१ ते १५० पदे १५१ ते १६० पदे १६१ ते १७० पदे १७१ ते १८० पदे १८१ ते १८८ पदे १ ते १० पदे ११ ते १७ श्लोक १ ला अभंग २ रा अभंग ३ रा अभंग ४ था अभंग ५ वा आरती गणपतीची आरती विठ्ठलाची आरती पांडुरंगाची आरती रामाची आरती मारुतीची आरती कृष्णाची आरती खंडेरायाची आरती नरहरीची आरती नृसिंहाची आरती मोहनीराची आरती मोहनीराजाची आरती देवीची आरती जगदंबेची आरती ललितादेवीची आरती भागीरथीची आरती गुरूची पदे १ ते १० पदे ११ ते २० पदे २१ ते २८ पदे १ ते १० पदे ११ ते २० पदे २१ ते ३० पद ३१ वें पत्रिका भागीरथी ३२ वीं पदे ३३ ते ३८ पत्रिका भागीरथी ३२ वीं मध्वमुनीश्वरांची कविता Tags : kavitamadhvamunipoemकविताकाव्यमध्वमुनी पत्रिका भागीरथी ३२ वीं Translation - भाषांतर परिसे गंगे त्रिपंथे गे । तुझें दर्शन मी नेघें ॥ध्रु०॥जयनिये जिवलगे । मुक्तिपद मग नलगे ॥१॥चित्त गुरुच्या चरणीं रंगे । ऐसी सद्गुरुभक्ती देगे ॥२॥माझें बोलणें वात्रट । याचा मानूं नको वीट ॥३॥केला सगराचा उद्धार । राजधर्मात्मा उदार ॥४॥माझी तुज भीड काय । नव्हे भगीरथराय ॥५॥येऊन राहों मी तुझे कांठीं । ऐसें पुण्य नाहीं माझे गांठीं ॥६॥हीन दीन मी भिकारी । मन मळीन विकारी ॥७॥अंध कुरूप आळसी । त्यासी सांडुनि कोठें पळसी ॥८॥गंगा येते आळश्यावरी । हें तूं सत्य वचन करी ॥९॥गंगे तुझें वोझें । न मानितां वचन माझें ॥१०॥शतयोजनांहीवरी । तुझें स्मरण जो करी ॥११॥त्यासी नेसी विष्णुलोका । तेथें आम्हांसी काय धोका ॥१२॥तुझी लागली अवसरी । वाट पाहातोंहे घरीं ॥१३॥वाट चुकोनिया येसी । पाय झाडीन मुक्तकेसी ॥१४॥येई पाताळविवरें । करी पावन बिरुद खरें ॥१५॥तुझ्या उदकें अभिषेक । करीन देवासी आवश्यक ॥१६॥तहान लागलीहे भारी । पाजी शिवसीतळ वारी ॥१७॥दशहर्याचा उत्सव । करीन धरूनिया भाव ॥१८॥भाव जरी आहे चंगा । तरी काठवठींत गंगा ॥१९॥गुरुभक्ताचिये घरीं । सायुज्यता पाणी भरी ॥२०॥शुकयोगींद्राचे चरणीं । गंगा प्रयाग त्रिवेणी ॥२१॥बुद्धि टाकुनिया कुडी । देतों चरणतीर्थीं बुडी ॥२२॥राजसदननिवासी । न करी कलीचे सासुरवासी ॥२३॥बाहेर काढुनी जीवन । स्नान करितील सज्जन ॥२४॥कलश भरूनी उदक । करतील देवासी अभिषेक ॥२५॥त्यांचे उद्धरी पूर्वज । भेटउनी गरुडध्वज ॥२६॥नवस नवसावे किती । लावूं नको दिवसगती ॥२७॥सोसुनिया आटाआटी । धावे मध्वनाथासाठीं ॥२८॥ N/A References : N/A Last Updated : May 29, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP