आरती मारुतीची
मध्वमुनीश्वरांची कविता
रामदास्यासाठीं हव्यासी मोठा ॥ म्हणोनि अंजनीच्या आलासी पोटा ॥ उपजत ज्यानें केला बहुरूप तो खोटा ॥ सिंधू उडता ज्याचा न भिजे लंगोटा ॥१॥
जयदेव जयदेव जय श्रीबलभीमा ॥ भावार्थे आरती अभिनव तव महिमा ॥ध्रु०॥
सीता शोधुनि लंका जाळोनि आला ॥ श्रीरामाचे भजनीं हृदयीं निवाला ॥ प्रताप देखुनि लंकानायक तो भ्याला ॥ ब्रह्मादिक देव स्तविताती त्याला ॥२॥
हनुमंताचे स्मरणें पातकें जळती ॥ बळवंताच्या स्मरणें विघ्नेंही पळती ॥ ज्याचें दर्शन घेतां शास्त्रार्थ कळती ॥ मध्वनाथा साधन संपदा मिळती ॥३॥
N/A
References : N/A
Last Updated : May 28, 2017
TOP