गंगेचीं पदें - पदे १ ते ३
मध्वमुनीश्वरांची कविता
पद १ लें
गंगे पावन तूझें नीर ॥ध्रु०॥
गौतममुनिनें आणिलें प्रार्थुनि पातक केलें दूर ॥१॥
मध्वमुनीश्वर सांगतसे गुज ब्रह्मरसाचें सार ॥२॥
पद २ रें
गंगे माय टाकिलें कां मज दूर गे तुझ्या वियोगें ॥ फुटतो माझा ऊर गे ॥ दुरितपर्वताचा करूनियां चूर गे ॥ तुझ्या कृपेचा मजवर येऊं दे पूर गे ॥१॥
आवडती तुजला मत्स्य कच्छ गे ॥ दर्दुर कर्कट तारिसि जलचर स्वच्छ गे ॥ मजला मानिसी त्याहुनि अति तुच्छ गे ॥ जैसें ओंगळवाणें श्वानाचें पुच्छ गे ॥२॥
जैसी साकरेंतील निवडुनि मासी गे ॥ दूरी सांडिती ते गती माझी झाली गे ॥ बळकट बांधोनिया भवपाशी गे ॥ खडकीं आपटिलें सांगूं कोणापाशीं गे ॥३॥
गंगे तुझें पावन उत्तम तीर गे ॥ तीरांमधून वाहतें उत्तम नीर गे ॥ नीरावरील लागतां पवन स्थीर गे ॥ त्यासी उद्धरी तत्काळ रघुवीर गे ॥४॥
मध्वनाथ पाहतो तुझी वाट गे ॥ नित्य करितो भगवद्गीतापाठ गे ॥ दावी विश्वनाथनगरीचा घाट गे ॥ विश्वीं विश्वेश्वर प्रगटो लखलखाट गे ॥५॥
पद ३ रें
जय देवी नमो तुज गंगे वो ॥ध्रु०॥
दर्शन वंदन मज्जन करितां । सज्जनमानस रंगे वो ॥१॥
तव तटिं अर्जुनसारथि भेटे । दुर्जन दुर्गति भंगे वो ॥२॥
मध्वमुनीश्वर मागतसे तुज । माझी विनवी अंगें वो ॥३॥
N/A
References : N/A
Last Updated : May 27, 2017
TOP