मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|मध्वमुनीश्वरांची कविता|
आरती ललितादेवीची

आरती ललितादेवीची

मध्वमुनीश्वरांची कविता


जय जय त्रिपुरे सुखसरिते । ललिते मंगळगुणभरिते ॥ पतितपावन शुभचरिते । आरती भारती तुज करिते ॥१॥
उपांगनगरीची देवी । शांभवी म्हणती हे शैवी ॥ इजवरि निष्ठा जो ठेवी । तो नर मिष्टान्नें सेवी ॥२॥
श्रीपति गोपति वरदात्री । पूजिति जन जे नवरात्रीं ॥ दानें देती सत्पात्रीं ते नर मिलती चिन्मात्रीं ॥३॥
पिधानपूजेचा विधि हा । हातीं सांपडला निधि हा ॥ जाणे शुकमुनि गुणनिधि हा । नेणे फणिवर आणि विधि हा ॥४॥
दुर्गा भवानी शर्वाणी । सदैव स्तविली गीर्वाणीं ॥ मध्वमुनीश्वर दुर्वाणी । पूजुनि बसला निर्वाणीं ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : May 29, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP