स्वर अंतरंगाचे - प्रार्थना
काव्यसंग्रह - स्वर अंतरंगाचे
कवी - श्रीराम विठ्ठल गायकवाड
करतो मी वंदन श्री स्वामी समर्था ॥धृ०॥
माझी ही भक्ती आपुल्या चरणा प्रती
सेवा स्वीकारावी तव भगवंता ॥१॥
माझ्या जीवनी जाई सत्य मार्गानी
सज्जना मी मानी घ्या वंदन आता ॥२॥
मिथ्याला धि:कारीन सत्य स्वीकारीन
पूजीतो मी चरण सांभाळी भक्ता ॥३॥
माणुसकी माझा धर्म सत्य ते कर्म
घडेल ना अधर्म माझीया हाता ॥४॥
राहीन मी संयमाने सदाचाराने
धक्का न दुजा मने घेई दक्षता ॥५॥
ढळे ना स्वाभिमान भावना ना मन
करी ना दुर्वर्तन सदासर्वथा ॥६॥
उच्च नीच ना दलित धर्म ना जात
समभाव मनात हे कृपावंता ॥७॥
सुखदु:ख जाणीन सज्जन बनेन
दीन दुबळ्या रक्षीण तूची आता ॥८॥
देव धर्म देश माझ्या मनी हा ध्यास
कसा विसरेन त्यास श्री स्वामी समर्था ॥९॥
N/A
References : N/A
Last Updated : January 30, 2023
TOP