स्वर अंतरंगाचे - साक्षर जनता
काव्यसंग्रह - स्वर अंतरंगाचे
कवी - श्रीराम विठ्ठल गायकवाड
साक्षर जनता हे भूषण मारता
हेची तत्त्व धरु, सर्व साक्षर करु ॥ध्रृ॥
मुला मुलींना शाळेत पाठवू
शिक्षणाने नटवू थाटवु
अभ्यासाचा मार्ग दाखवू
गुणवाणाचे धडे शिकवू
हेची व्रत स्वीकारु ॥१॥
नियमीतपणा दाखवून देऊ
चुकारपणा सोडाया लावू
सद्मार्गाची दिशा दावू
सर्वांना आज्ञाधारक बनवू
गुरु उपदेश स्मरु ॥२॥
निरक्षरतेचे शोधू मुळ
थोपवू ही गळती समूळ
हाती धरुनी नेऊ सकळ
आरंभण्या ज्ञानाची सकाळ
निरक्षरता नष्ट करु ॥३॥
शिक्षणाअभावी सोन केरात
अमोलाचे मुल्य फक्त शुन्यात
राही जे सुमन अविकसीत
फुलल्या विना तसेच कळीत
यांचा उध्दार करु ॥४॥
गरीबी शिक्षणाचा अडसर
हातभार लावूनी करु दुर
फुलेपालक योजना घरोघर
तोची दिवाळी दसरा देशभर
निरक्षरता संहारु ॥५॥
शिक्षणाचा विकास होऊनी
अंगठा राक्षस नाही गेला
कोण असे कारण या दोषाला ?
सक्ती कायदा हवा शिक्षणाला ?
हे धोरण अंगीकारु ॥६॥
कुणी बना शिक्षण महर्षि
अज्ञानी जना देण्या शिक्षण
कुणी व्हावे शाहू महाराज
ज्ञानदीप बनुनी महान
दीनदलिता उध्दारु ॥७॥
N/A
References : N/A
Last Updated : February 02, 2023
TOP