स्वर अंतरंगाचे - हेच का ते ...
काव्यसंग्रह - स्वर अंतरंगाचे
कवी - श्रीराम विठ्ठल गायकवाड
हेच का ते बागायत दारातील एक
बहु झाले पण यांचे वेगळे कौतुक
हे गांवातील नगदी पिकाचे मालक
यांचा मी पणा डामडौल चाले अनेक ॥१॥
हेच का ते ज्याचे जीवन मोठे खुशीत
दारु मटणाच्या पार्ट्या चाली हाँटेलात
मैफलीत उळपट्टी करी मजेत
उष्टे कधी दिले का गरीबाच्या ताटात ॥२॥
हेच का निवडणूकीतील प्रचारक
यांना पक्षा ना ध्येय हे पैशाचे मालक
नेत्याच्या थापा यांच्या पाठीवर अनेक
म्हणून काही करती गुन्हे निवडक ॥३॥
हेच का ते जातीच्या नांवाखाली नाचती
दीन दलितावर हे अन्याय करिती
पैशाच्या जोरावर कायदा तूडविती
काहीनातर जीवनातून उठविती ॥४॥
हेच का ते जातीभेदाला स्टेजवरती
कलंक मानीत भाषणबाजी झोडती
स्वीकारलेले हार सुकण्या अगोदर
जाती धर्माच्या नांवावर मते मागती ॥५॥
हेच असे का भ्रष्टाचाराचे शिरोमणी
खाणाराची लाँबी दिसे येथुनी तेथुनी
काळ्या बेराचें हात जाऊलागे झडुनी
कोण संपवी बहुगुणी गोळ्या देऊनी ? ॥६॥
हेच का ज्याचा खाऊनी कोट मोठा झाला
मीटर किलो असे नेहमी फायद्याला
आपण साखरेपेक्षा गोड बोलण्याला
तसेच थोडेसे जाणावे माणुसकीला ॥७॥
हेच का तेच का आम्ही नेहमी म्हणावे
तुम्ही मात्र अधर्मानेच पुढे चालावे
तसे जाता, रहाता करावे करवावे
माझ्यामते जाण्यापूर्वी हे सर्व सोडावे ॥८॥
N/A
References : N/A
Last Updated : February 02, 2023
TOP