स्वर अंतरंगाचे - तो म्हणतो
काव्यसंग्रह - स्वर अंतरंगाचे
कवी - श्रीराम विठ्ठल गायकवाड
अग ये काय आणल
बघ थोड निरखून
बरेच काही मिळाल
ठेव लवकर झाकून ॥१॥
आज एजंट आला
चार काम घेऊन
ओझे झाले खिशाला
मन गेले भारावून ॥२॥
साहेबाच्या डोळ्यात धूळ
अर्ज करतो मी खालीवर
बरोबर घालतो मेळ
साहेबा कसे कळणार ॥३॥
पार्टीत गेलो काल
किती माझा आदर
चमच्याची हालचाल
ग्लास सुक्याचा बहूजोर ॥४॥
वाचलात का पेपरात
वाचताच मी घाबरलो
पकडणारे नाहीत का खात ?
म्हणें रंगेहात पकडले ॥५॥
अगे तू अज्ञानी आहेस
तुला मुळी नाही कळत
तू फायनल शिकलीस
हे डोक्यान खाव लागत ॥६॥
स्टीलचे काही चमचे
आहेत माझ्या हातात
ठेवलेत सर्व भागात
करु नकोस भ्रांत ॥७॥
मी कुणाला भीत नाही
आहे पाठीशी मोठा नेता
मेजवानी दिली की
कसलीच नाही चिंता ॥८॥
अरे लुबाडा तुला ना पुरे
जोगव्यातील याचनेचे पीठ
काहीही कसलेही देवोत
उष्टयान्नावर भरतोस पोट ॥९॥
N/A
References : N/A
Last Updated : February 01, 2023
TOP