स्वर अंतरंगाचे - कुठवर चालणार
काव्यसंग्रह - स्वर अंतरंगाचे
कवी - श्रीराम विठ्ठल गायकवाड
असेच कुठवर चालणार ॥ध्रृ॥
बरीच वर्षे लोटली
कुणाची दृष्ट लागली
ही दुर्दशा ना संपली
किती हे येरझार ॥१॥
अमृत म्हणूनी प्यालो
मी मदिरेत फसलो
आता भयभीत झालो
त्या चुकीला हा मार ॥२॥
राग लोभ संपविला
मद मत्सरही गेला
आघात स्वाभिमानाला
याचाच सदा भार ॥३॥
रोजच चाले प्रार्थना
ना मी चुकलो दर्शना
विचार शोभे सज्जना
माझा हा सदाचार ॥४॥
हे कसले आहे कर्म
घायाळले माझे मर्म
शोधू लागे दया धर्म
कधी मिळे आधार ॥५॥
N/A
References : N/A
Last Updated : February 01, 2023
TOP