स्वर अंतरंगाचे - विसरु नको
काव्यसंग्रह - स्वर अंतरंगाचे
कवी - श्रीराम विठ्ठल गायकवाड
काय तुझे हे गुण आतून तमाशा वरुन कीर्तन
असा स्वार्थ साधू नको लोकांना फसवुनी
अशी गद्दारी करु नको दीनाला भोंदूनी
विसरु नको होईल निरर्थक जीवन ॥१॥
सज्जन आहे भासवून, नको करु ढोंग
आपोआप दिसेल जना, तुझे अंतरंग
विसरु नको बाहेर येतील ते दुर्गूण ॥२॥
कर्तव्यच्युत होऊनी करु नकोस कर्म
लबाडी आणि कपट यात आहे अधर्म
विसरु नको मिळेल तूला दैवी शासन ॥३॥
तुजला प्राप्त झाले धनधान्य मोठेपणा
त्यानाच करीतसे वंदन, ना तुझ्या गुणा
विसरु नको तू आहेस माणुसकी हीन ॥४॥
प्रसंगी येती दीन दुबळे जन पैशाला
जादा टक्केवारीला, तुम्ही मात्र हापापला
नको घेऊ अर्धीतील चतकोर ओढूनव ॥५॥
लुटतसे दीन दलिताच्या घामाचा पैसा
लुटी दीनदलिताच्या मानधनाचा हिस्सा
विसरु नको फेडावे लागेल हे शोषण ॥६॥
तुझे हे वैभव हवेली जमीन जुमला
थाटामाटात नि ऐश आरामात रमला
विसरु नको होत असते रात्र व दिन ॥७॥
सेवाधारी विसरती शपथ कर्तव्याची
काबरे आशाबाळगती पाण्याच्या पैशाची
विसरु नका तुमचे हाती त्याचे जीवन ॥८॥
अशी लुटालुट तुम्ही मानाल दैवी खेळ
श्रीमंतीच्या योगे कुठेही शिजवाल डाळ
विसरु नको तू, हे नव्हे निसर्गाचे दान ॥९॥
N/A
References : N/A
Last Updated : February 01, 2023
TOP