स्वर अंतरंगाचे - एकात्मता
काव्यसंग्रह - स्वर अंतरंगाचे
कवी - श्रीराम विठ्ठल गायकवाड
पण दर्शनास एकाच रांगेत ॥ध्रृ॥
खादीचे ते कपडेवाले
गप्पा झोडीत रुबाबात
शेजारी निळ्या टोपीवाले
हसुनी होकार मजेत
कधी निळ्या टोपीत हात
बाकीचे मिष्कील हास्यात ॥१॥
चक्र आरुढ खुर्चीवर
विळा कोयता जवळ
टोची चक्रा करी बेझार
करावी का खादी घायाळ
घालू निळ्या टोपीला हार
करु चक्रांकीत हा काळ
घेती चिमटे मंदिरात ॥२॥
पुढे खुर्चीत गप्पा चाले
आम्हा युतीचा झेंडा डोले
आम्हा मिळाले तेल तूप
धुपाटणें काँगीला आले
शरद विरोधी खुशीत
मग सर्व काही आपले
चाले महाराष्ट्र राज्यात ॥३॥
कुणाकडे डोळे लागले
बसुनी एका छताखाली
समधर्मभाव दिसले
एकता येथे स्थिरावली
कर्तव्य ज्याचे डोळा दिसे
डाँक्टर सर्वांची माऊली
एकात्मतेचा हाची हात ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : February 02, 2023
TOP