स्वर अंतरंगाचे - आदर्श गाव
काव्यसंग्रह - स्वर अंतरंगाचे
कवी - श्रीराम विठ्ठल गायकवाड
सुखी असा आनंदी की महा
गुणी आमुचा एक आदर्श गाव हा ॥ध्रृ॥
जात नी धर्म नसे कोणाच्या मनी
आपुलकी प्रेमभाव नांदे जनी
एकात्मता वाढे सौख्य फुले तव महा ॥१॥
गावकर्ते नेते आहेत सद्गुणी
विकास जनसेवा सदैव ध्यानी
मनमिळावु सज्जनपणाचा गुच्छ हा ॥२॥
लोकात लोकशाही सुखात नांदे
बाचाबाची तंटा ना कुटीलवादे
थारा ना येथे सूडबुध्दीला कर्ते महा ॥३॥
ज्ञानमंदिरी शिक्षण मिळे समभाव
सेवाशील गुरुजी ना उठाठेव
बालमन सुमने फुलविती ते महा
ग्रामसेवक करीतसे त्यांचे कौतुक पहा
कुणबी मजूर राबे दिनरात
अन्न धान्य देती, धन्य ते गावात
सर्व चित्त प्रपंचात सुख देती महा ॥६॥
डाँक्टर सेवाभावी ना दुजाभाव
रुग्णाच्या सेवे, नसे पैशाची हाव
रोगमुक्त करिती, आनंद देई महा ॥७॥
योग्य देती व्यापारी दुकानदार
कुशल असे आमुचा कारागीर
गाव विकासात आघाडीवर वर्ग हा ॥८॥
गाव आमुचा झाला सर्व साक्षर
कोणी व्यसनी चोर ना गुण्हेगार
दारु दुकाने ना आड्डे सरपंच महा ॥९॥
तालींम मशीदी प्रार्थना मंदिरे
धर्म ना जात येथे एकत्र सारे
महात्माजी सांगे असे आदर्शाने रहा ॥१०॥
N/A
References : N/A
Last Updated : February 01, 2023
TOP