स्वर अंतरंगाचे - सावली
काव्यसंग्रह - स्वर अंतरंगाचे
कवी - श्रीराम विठ्ठल गायकवाड
ही माझी प्रेमळ सावली ॥ध्रृ॥
आई वडिलाची पुण्याई
त्याच्याच कष्टाची भलाई
दिसली मला ठायी ठायी
मी वाढलो त्या पंखाखाली ॥१॥
ही कृपा असेल दैवाची
की असेल लोकशाहीची
की कुणाच्या आशिर्वादाची
त्याच योगे ही प्राप्त झाली ॥२॥
हे कर्तृत्वाने साध्य केले
कर्तव्याचे फळ मिळाले
ते कर्मधर्माने झेलीले
त्याचीच उतराई झाली ॥३॥
सरस्वतीने स्वीकारले
अभ्यासाने सामर्थ्य दिले
कलेनेच प्रसिध्द केले
त्याच देणगीची ही वल्ली ॥४॥
मी पक्षाचा असे पाईक
जन ऐक्याचा संयोजक
मी माणुसकीचा नायक
ही त्यांचीच कृपा लाभली ॥५॥
मी विधायक कार्य केले
दीनदलिताना जाणीले
मी त्यांचे दु:खाश्रु पुसीले
मी वाढलो या छताखाली ॥६॥
हा देश असे संस्कृतीचा
सतशील नी पुण्याईचा
श्रीराम आणि श्रीकृष्णाचा
हीच मी सेवेत पुजीली ॥७॥
येथे येण्या पैसा कुठला
फक्त बुध्दी ज्ञान प्राप्तीला
हाची आधार जीवनाला
त्यामुळे पावली माऊली ॥८॥
तू सावली बनुनी रहावे
जो पर्यंत आहेस सावलीत
आजचे कर्तव्य उदयाचा अंत
हींच सेवेचीं कृपांजलीं ॥९॥
N/A
References : N/A
Last Updated : February 02, 2023
TOP