स्वर अंतरंगाचे - काहिच्या गाड्या
काव्यसंग्रह - स्वर अंतरंगाचे
कवी - श्रीराम विठ्ठल गायकवाड
काहीच्या गाड्या पाण्यावर चालती ॥धृ०॥
रस्ता दुरुस्तीचे कामकाज
दाखविती कसे ऐटबाज
किती देती मजूराला राज
काल दहा चौदा झाले आज
सहा इंच जाडीला दहा लिहिती ॥१॥
बांधकाम सुधारणा चाले
मिस्त्रीला त्यात सामील केले
बे दुणें चार छे सहा झाले
सर्वाचेच होई चांगभले
कितीही झाकले बाहेर पडती ॥२॥
शिफारशी दाखले उतारे
टाळा टाळ करी हातवारे
दीन दलित बसे बिचारे
पैसा दिला की फिरवीसारे
एकेक दिवस बाहेर काढती ॥३॥
जीवना मरणा कारण हा
याच्यापासून सावध रहा
केव्हाही तुला फसवील हा
कोण लोभस स्वत:ला पहा
पाण्याच्या पैशाची नकोच संगती ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : January 30, 2023
TOP