स्वर अंतरंगाचे - पान
काव्यसंग्रह - स्वर अंतरंगाचे
कवी - श्रीराम विठ्ठल गायकवाड
दिसते ज्याच्या अंतरंगात
लपलेले बहुमोल रुप
दिसते ज्याच्या जोमात
जीवनाचे चालते स्वरुप ॥१॥
काहीतती सुचित करुनी
ज्यांचे बाह्यांग चमकेल
ज्याचा परीसासम स्पर्श
अवतार बदलुनी जाईल ॥२॥
ज्याच्या पोटात पेटलेले रान
जळत जाऊन जाळणारे दिसेल
कुठे जळणार्या जंगलाला
वर्षा होऊनी विझवीत जाईल ॥३॥
असेल प्रेमाने ओथंबलेले
असेल मायेने बहरलेले
असेल वैरत्व पेटलेले
असेल गर्वाने दाटलेले ॥४॥
दिसेल हात अन्नदानातील
दिसेल वृत्ती नादानीतील
दिसेल हात भ्रष्टाचारातील
दिसेल चमचा खरकट्यातील ॥५॥
कष्टकर्या दीनदलिता घरची
घामातील अमृत धाराची भाकरी
तर कुठे हवेलीतील लुटारुची
लुटलेल्या पिठाच्या अन्नाची शिदोरी ॥६॥
दिसेल रक्ताळलेला देहपडलेला
दिसेल कोणी सांडलेले रक्त शोषताना
दिसेल कोणी देह फाडताना
दिसेल कोणी देह जोडताना ॥७॥
असेल कष्टाच्या पैशाचे घरे
लक्ष्मीच्या सौदर्याने नटलेले
असेल सेवा पुस्तकाचे पान
ज्यात कर्तृत्त्व नोंदलेले ॥८॥
N/A
References : N/A
Last Updated : February 02, 2023
TOP