स्वर अंतरंगाचे - हिम्मत ना सोड
काव्यसंग्रह - स्वर अंतरंगाचे
कवी - श्रीराम विठ्ठल गायकवाड
नीच करतील खोडया, हिम्मत ना, सोड वेडया ॥ध्रृ॥
तुला अडचणीत पाहून
करु लागले खच्चीकरण
भिऊ नको, धीराने प्रसंगा सामोरे जा गडया ॥१॥
शत्रु करु पहातो सावज
वात पहातो येण्याची सांज
त्याला हाणून पाडण्या, कर हात सवंगडया ॥२॥
ती वाट पहाती दौर्बल्याची
तुझे लुटण्याची मिटण्याची
तू रडून संधी देऊ नको, हसण्यास गडया ॥३॥
कमी करण्या तुझी अस्मीता
मुर्ख बनविती तुला आता
हळूवार मनाला आवर, मारीर रे उडया ॥४॥
तुझी असभ्य चर्चा करती
मानहानी करुनी खेचती
तुला भोवर्यात फसविण्या उडवी वावड्या ॥५॥
विचार ना करी इज्जतीचा
माणुसकीचा ना कर्तव्याचा
ढवळू पहाती प्रतिष्ठा अशाना दे लाथाडया ॥६॥
वाघाला फसविले गाळात
कोल्हेकुई सुरु रे जनात
जरी असे घडले तरी घाली मनाला बेडया ॥७॥
तुझ्या दु:खात जे समाधानी
रहाणीमानात जे दुर्गूणी
आपोआप अशाच्या होतील चिंधडया, चिंधडया ॥८॥
N/A
References : N/A
Last Updated : February 01, 2023
TOP