स्वर अंतरंगाचे - झुंज
काव्यसंग्रह - स्वर अंतरंगाचे
कवी - श्रीराम विठ्ठल गायकवाड
उपकार कर्ता सवित्या तळपेल इथ मोठया दिमाखात
जरी असेल मित्र तरी एकवेळ करील पराधीन
शीतल चंद्रमा गुलाबी प्रणया साथ देईल
एकवेळ ओहोटी होताच गंधर्व बया होईल मालकींण
जीवनाच्या प्रवासात सवित्या चंद्रमा येणार आहे
जाणार आहे तेव्हा कोण हसणार आहे कोण रडणार
आहे झुंजीतच तुला बहुमोल जीवन जगावे
लागणार आहे ॥१॥
करतील स्वागत कधी प्रेमभरे हसत हसत
प्रसंगी करतील कुचेष्टा मिष्कील हास्यात
कधी गिळंकृत करण्याचा यशस्वी प्रयत्न करतील
तर कधी अपघाती प्रयत्नात फसुनी फसतील
झुंज द्यावी लागणार अशा दाही दिशाला
चिखल काट्याच्या फांदीतून वाट काढावी लागणार
तुला जीवन सार्थकी लावण्याला ॥२॥
या बारा महिन्याच्या कालचक्रात सर्वांची ओळख
होणार आहे पावसाळ्याच्या सुजलाम सुफलाम
मैदानातून डुलत जाण्याची वेळ येणार आहे
चहुबाजुनी हिमाच्या दरडी कोसळत असताना
तुला तुझे काळीज अबाधीत ठेवावे लागणार आहे
तर कधी तप्त उन्हाळ्यात तुझ्या डोक्याला विचाराच्या
चांदण्याची शीतल छाया द्यावी लागणार आहे ॥३॥
सुकाळाची आल्याददायक पहाट दुष्काळाचे सावट
दिवाळीचा मधुर आश्वाद शिमग्याचा होळीचा
चटका देणारा प्रसंग येईल जाईल
तुला सुख पचऊन दु:खाशी झुंज द्यावी लागणार आहे
पहाण्या मिळे स्वातंत्र्याच्या पाशमुक्तीचा आनंदी
सुदिन तर कधी प्रजासत्ताक दिनाचा हक्क व कर्तव्य
सांगणारा मौलिक क्षण
वाढ दिवसाचा भव्य सोहळा तर पुण्यतिथीचे मशाली
स्मरण मानवतेच्या राक्षसाचे आत्याचारी मातलेले उधाणें
दिसेल मृगजळी बंधुत्वाच्या जीवनात दीनदलिताचे
जिणें थोडा वेळ सावली बरेच उन्ह, जगावे लागणार
तुला झुंजीतच जीवन ॥४॥
जात सत्ता संपत्तीपुढे सत्य माणुसकी दिसेना झाली
कदर ना कुणा निर्मळ मनाची रक्तपिणे ज्याचा धंदा
मानवी देहात श्वापदाची वासना, घेई गाईगुराचा
फायदा न्याय देवता आशावादी बनवील रवि तेजो-
पुंजाच्या झोतात न्हाऊ घालू पाहींल
कधी रुसुन बसेल कोपर्यात सत्ता शक्ती संपत्तीच्या
पाषाणात पाषाण हृदयी हिम्मतीचा सुरुंग लाऊन
ही पाषाणें तुला करावी लागतील चक्काचूर
न्यायासाठी मानवतेसाठी तुला
आंबेडकर, फुले, शाहु, गांधी व्हावे लागेल
झुंज देतच स्वराज्याचे सुराज्य करावे लागेल
जेथे अंधार तेथे दीप व्हावे लागेल ॥५॥
N/A
References : N/A
Last Updated : February 02, 2023
TOP