स्वर अंतरंगाचे - क्रांती
काव्यसंग्रह - स्वर अंतरंगाचे
कवी - श्रीराम विठ्ठल गायकवाड
ठेऊ गुणवाणाचा आदर्श डोळ्या पुढती
पेटवूनी ज्ञानाच्या मशाली करुया क्रांती ॥ध्रृ॥
ममता समता ज्याचे अंगी
नसानसात भरुनी उरली
तोंडपुजेपणा नव्हता मुळी
न्याय निष्ठुरता दाखविली
मन जयाचे पवित्र होते
रुपवतीला माता मानली
असे व्हावेत बहुशिवाजी या भूवरती ॥१॥
दलिताच्या अंधारी जीवनी
वातीसम जळत राहिला
होरपळणारा तो बगीचा
स्वत:च्या अश्रुनी फुलविला
उघडया देश बांधवासाठी
उघडया अंगी शेवट केला
अशी हवी बापुजीसम त्यागी देशभक्ती ॥२॥
अजुनी अन्याय अत्याचार
लपुनीच काढी तोंड वर
माणुसकी हीन धर्म चाले
इथे नात्या गोत्याचा बाजार
दीन दलित झोपडीतील
कळीचा कोण करी उध्दार
शाहु फुलेसम यावा प्रेषित पृथ्वीवर ॥३॥
जेथे सोन नाण बोलू लागे
तेथे सत्य काळ्याशाली खाली
घेऊनी बसते मांडीवर
खुनी दंगलखोर जंगली
दया धर्म ओठातच दिसे
मानवता पैशाने गिळली
महापुरुषानी, जाळुनी टाकावी नींचकृती ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : February 01, 2023
TOP