स्वर अंतरंगाचे - रखवालदार
काव्यसंग्रह - स्वर अंतरंगाचे
कवी - श्रीराम विठ्ठल गायकवाड
हा आपुला रखवालदार ॥ध्रृ॥
मध्यरात्री भरबाराला
सावधान इशारा आला
नेकदार तो वीर भला
रामोशी असे म्हणें त्याला
हा रक्षक इमानदार ॥१॥
ज्याचे झोपडीच निवास
कष्टकरी रात्रं दिवस
कुटुंबा जगविणें ध्यास
व्यर्थ ना धरी तो हव्यास
सत्यावरच त्याचा भार ॥२॥
ज्यावेळी याची चाले गस्त
तेव्हा कोणी घरात सुस्त
तर कोणी रंगती मस्त
असतील कोणी बेशीस्त
पण हा असे निर्विकार ॥३॥
आडवे येता बलदंड
हाही वीर थोपटी दंड
सोडूनी काढी त्याचे बंड
ती पळवून लावी झुंड
धन्य रक्षक बहादूर ॥४॥
हाची सांभाळी तुझे धान
तसे सांभाळी सोन नाण
रक्षीतसे माता बहीण
असे तो भीम काय जाण
मला वाटते हाची थोर ॥५॥
N/A
References : N/A
Last Updated : February 01, 2023
TOP