स्वर अंतरंगाचे - न्याय
काव्यसंग्रह - स्वर अंतरंगाचे
कवी - श्रीराम विठ्ठल गायकवाड
अन्यायी पाषाण भिंती पलीकड
न्यायाची होत आहे पडझड
सुरुंग बनुनी कोण पाडी भिंती
न्यायाला पाशमुक्त करण्या कधी उभारी शक्ती ॥१॥
भिऊ नकोस हिम्मतीने चालत रहा
निर्मळ असा सदैव न्याय देऊन पहा
धर्म असे न्यायात सांग जगाला
मुक्ती असे त्यात हेही सांग शेवटाला ॥२॥
पैसेवाले हवेलीवाले लोक
असतील नेते आणि अधिकारी अनेक
आपण न्यायनिष्ठुर झाल्यावर
बंदुकीच्या गोळ्याही जातील विरुन पार ॥३॥
न्याय गुन्ह्याचा काळ तसा कर्माचे फळ आहे
न्याय हा माणुसकीचे मुळ आहे
न्याय देण्या घेण्याला कठोर आहे
तसा फसुनी फसवाया हुषार आहे ॥४॥
न्याय गुन्ह्याचा शेवट करतो
तर कधी रोपटयाला, मोठाला वृक्ष बनवितो
न्याय वाघाला भिऊन पळतो
तर कधी हरिणाची सावली बनुन रहातो ॥५॥
न्याय कधी अग्नीकुंड बनुनी जाळतो
तर कधी जलकुंभ बनुनी अग्नी शमवितो
न्याय विचाराचे मंथन आहे
तसे आत्म्याचे चिंतन आहे ॥६॥
न्याय पडद्या आडील गुपीत आहे
तसे स्टेजवयील सत्य आहे
रुढी बंधनाचा नाटकी न्याय देऊ नकोस
दीनदलिताचा भक्षक होऊ नकोस ॥७॥
न्यायी बना सूर्यप्रकाशाइतक सत्य असाव
ढगाआडील सूर्याइतकी असत्य नसाव
न्याय द्या शिवाजी महाराजा सारखा सत्याने बहरलेला
चार भिंतीत घडूनही जगभर पोहोचलेला ॥८॥
झटकुनी टाक शरीरसुखाच्या आशा
मनोराज्याच्या ऐश्वर्याच्या विचारातील
न्यायी बना तुम्ही देवासारखे
सर्व शक्ती आवाक होतील ॥९॥
न्याय देण म्हणजे तरवार बनुनी
अन्यायाला थोडत जाण
न्याय घेण म्हणजे भोपळा बनून
तुटत रहाण ॥१०॥
न्याय म्हणजे जन्माचा साथी आहे
कधी अर्ध्यांवर विझणारी ज्योती आहे
कितीही मारल तरी सत्य मरत नाही
कितीही झाकल तरी असत्य झाकत नाही ॥११॥
न्याय दिला थोरा मोठयानी तसा महात्म्यानी
दीनदलिताचा, सावली बनुनी
सावली बनता आले नाही, तरी ती झाडे पाडू नकोस
अन्यायाची कुर्हाड लावुनी ॥१२॥
N/A
References : N/A
Last Updated : February 02, 2023
TOP