स्वर अंतरंगाचे - पाऊस
काव्यसंग्रह - स्वर अंतरंगाचे
कवी - श्रीराम विठ्ठल गायकवाड
आला आला पाऊस
मला वाटे समाधान । आता नसे काय उण
होऊ नकोस उदास । आला पाऊस पाऊस ॥१॥
पशु पक्षी आनंदले । चारा पानी खूप झाले
पारावार ना सुखास । आला ॥२॥
तृप्त झाली धरती । पिकतील जीवन मोती
आता ना कमी धनास । आला ॥३॥
प्रफुल्ल झाल्या दाही दिशा । लोपवावे दुर्दशा
संपेल आमचा ध्यास । आला ॥४॥
तृप्त झाली झाड वेली । फळे फुले बहरली
सृष्टीची आम्हाला कास । आला ॥५॥
झाली बघ चंगळ । गेली धूवून मरगळ
होऊ नकोस हताश । आला ॥६॥
पिके डोलती जोमाने । धनी नाचती प्रेमाने
किती गाऊ मी गाण्यास । आला ॥७॥
सान थोर सुखावले । सर्वत्र सांगू लागले
प्रेमे वंदुया श्रीस्वामीस । आला ॥८॥
N/A
References : N/A
Last Updated : January 30, 2023
TOP