स्वर अंतरंगाचे - बाबासाहेब
काव्यसंग्रह - स्वर अंतरंगाचे
कवी - श्रीराम विठ्ठल गायकवाड
बाबाना पंकज म्हणावे की
काळोख्यातील दलित दीप
भवसागरातील ज्ञानी राजा की
जन समतोलाचे मौलिक माप
की पिढयान पिढया टाकाऊ लोहा
मिळालेला परिस दीप ॥१॥
हाती न्यायाची लेखणी घेऊनी
समाजाची थोपविली अधोगती
संकटसमयी हात देऊनी
दलित बांधवा दिली शक्ती
जे होते लाजीरवाणें जिणें
त्यानी त्याला दिली मूठमाती ॥२॥
जातीभेदाची मर्यादा गेली होती
पार रसातळाला दगड बनुनी
काही गिधाडे बसली होती
मानवतेचे भक्षक होऊनी
त्यानी आस्मीता प्राप्त केली
हाती घेऊनी ज्ञानाची स्वामीनी ॥३॥
बळकटा लुळे पांगळे करुनी
कष्टकर्या उपाशी ठेविले
माणसाने माणसा हीन लेखुनी
बंधुला बंधुच मारक झालें
याना दाखवुनी न्यायाची जागा
ते जातीय वणव्या पुढे वर्षा झाले ॥४॥
हा ज्ञानेश्वर आपल्या घटनेचा
दलित जागृतीवीर माणुसकीचा
ही भारतीय न्यायाची समशेर
झोपडीतून चमकली जगभर
आमची पुरीकराया अधुरी इच्छा
हवा आहे आम्हा वारसदार ॥५॥
समस्त संतानी उपदेश करुनी
संदेश जगी पोहचविली
पोथी पुराण कुराण नुसते
अंधश्रध्देने सेवा पठणाला
उंबरठा ओलांडूनी जाती
कोण स्मरी महात्मा संदेशाला
बाबानी मसुदा तयार करुनी
कायद्याला समतेचा कणा केला ॥६॥
N/A
References : N/A
Last Updated : February 02, 2023
TOP