स्वर अंतरंगाचे - शिक्षक दिन
काव्यसंग्रह - स्वर अंतरंगाचे
कवी - श्रीराम विठ्ठल गायकवाड
ठेवा त्याचे स्मरण जो उजेड देतो दीप होऊन ॥ध्रृ॥
सांदीपनी विश्वामित्राच्या रुपाचा
दादोजी जिजाईच्या शिकवणीचा
सानेगुरुजी टागोराच्या आदर्शाचा
सावित्रीबाई भाऊच्या वात्सल्याचा
जो बनुन वारसदार करतो ज्ञानदान ॥१॥
श्रावणाच्या सरीत भिजणारा
सृष्टीच्या सौंदर्यात सजणारा
इंद्रधनुच्या रुपात चमकणारा
फुलासारख गंधांत करणारा
अशा पवित्र सेवकाचा आज महान सुदिन ॥२॥
डोंगर दरी, वणवा जीवन जो सांगेल
पाकळ्या फुले, रोपटे तरु जो वाढविल
रजनी सवित्या, नयन कर्ण दाखवील
महान वाटाडया अखंड झिजेल चंदन बनुन ॥३॥
बहु फुलती सुमने पृथ्वीवरी
जो तो गंधीत करी आपल्यापरी
अबाधीत सीम रहीत गंध ज्यांचा
ना लुटे लुटारु हवे ना तिजोरी
अमापाचे माप देणाराचे गावे गुणगाण ॥४॥
जयाचे जवळ धान्य ना धन
ज्ञानदान हेची जयाचे भूषण
ध्येय हेची, फुलविणें बालमन
पवित्र एकात्मता हेची चिंतन
तेथेच घडते सेवाधर्म कर्तव्याचे दर्शन ॥५॥
पदव्या घेऊनी उच्चस्थ गेलात
आज तुम्हा हाती असेल बहुत
दाता असो नसो बहुमानात
थोडे वळुनी पहा भूतकाळात
स्मरा गुरुची सदाचार संयम शिकवण ॥६॥
लोकशाहीने नटलेल्या देशात
पवित्र आहेत आमुचे हे हात
काळे बेरे घडविती सदोदीत
आम्ही मात्र तिन्ही काळी चांदण्यात
वंदुया राधाकृष्णन, सेवेची शान शिक्षकदिन ॥७॥
N/A
References : N/A
Last Updated : February 02, 2023
TOP