स्वर अंतरंगाचे - आगगाडी
काव्यसंग्रह - स्वर अंतरंगाचे
कवी - श्रीराम विठ्ठल गायकवाड
कोठून आली असे धावत
करीत धडधड
कुठे चालली अशी जोमात
करीत गडबड ॥१॥
तुला पाहुनी वाटते भिती
तू आगळी वेगळी
रस्त्यानी औत्सुक्याने पहाती
काहीशी तू बावळी ॥२॥
जाता येता कित्येक मारशी
होऊनी तू बेभान
तू रुपात आहेस राक्षशी
घालतेस थैमान ॥३॥
आसेतू हिमाचल सह्याद्री
वाट पहाती तुझी
पूरब पश्चिम आतुरली
भेट करण्या माझी ॥४॥
नसे जात धर्म तुजठायी
कोणीही हृदयात
भारतीयाची तू वाटे आई
कधी लोटी दु:खात ॥५॥
कधी सर्प बनुनी येतेस
करिशी जीवा घात
कधी बलीदान करतेस
बहुनेशी सोबत ॥६॥
बहुताची तू उपकारक
भलेसे वाटे जना
मनो मिलन करी तू नेक
समाधान जीवना ॥७॥
N/A
References : N/A
Last Updated : February 02, 2023
TOP