स्वर अंतरंगाचे - टोपी
काव्यसंग्रह - स्वर अंतरंगाचे
कवी - श्रीराम विठ्ठल गायकवाड
आपली टोपी किती छान छान
उंचावली तिने जगी आपुली मान ॥ध्रृ॥
टोपी निर्मळ शुभ्र कापसाची
ती शेतकर्याच्या तनमनाची
मजुराच्या श्रमाची नि मानाची
टोपीत या दोघाचा असे बहुमान ॥१॥
धागा झाला चरख्यावरी जरी
तळमळीची जोड झाली भारी
हितकारक बहुमोल सारी
बापूजी हातमागचे उगमस्थान ॥२॥
चरखा हातमाग विणकर
टोपी प्रसिध्द झाली जगभर
छान कोच रुबाब मनोहर
स्वातंत्र्यासाठी तिने उंचावली मान ॥३॥
बापूच्या देशभक्तीचे प्रतिक
स्वदेशी वापराचे हे द्योतक
अबालवृध्दाची उपकारक
जात ना धर्म ना पंथ ही गुणवान ॥४॥
अशा झगमगाटी टोप्या किती
रंगी ढंगी दिसे माणिकमोती
गांधी टोपी देशहिताची साथी
या टोपीकडे जातो स्वातंत्र्याचा मान ॥५॥
ही सर्वधर्म समभाव गुणी
देश परदेशात जानीमानी
पारतंत्र्यात स्वातंत्र्याची मानी
भारतीयानो दाखवा देशाभिमान ॥६॥
N/A
References : N/A
Last Updated : February 01, 2023
TOP