स्वर अंतरंगाचे - विठ्ठला
काव्यसंग्रह - स्वर अंतरंगाचे
कवी - श्रीराम विठ्ठल गायकवाड
विठ्ठला आगाध तुझी लिला
काही केल्या समजेना मला ॥ध्रृ॥
मी बसुन पहातो इथ
नाही दिसला सुना पथ
होत्या झुंडी जात नि येत
रीघ भाविकाची तुझ्या दर्शनाला ॥१॥
आज नाही एकादशी
शुभ दिन वा द्वादशी
सण ना धनाच्या राशी
अद्याप उलगडा नाही झाला ॥२॥
ज्याची कुठेही नाही एकता
भाषा पोषाख प्रांत भिन्नता
खान्यापिण्यात असमानता
तरी प्रसादास सव एकाच पंक्तीला ॥३॥
कुठे वाघ कुठे मृग दिसले
बगळे मांजर बोलू लागले
हे तुझ्याच रांगेत मी पाहिले
त्यांच्या तोंडी तुझा गजर ऐकला ॥४॥
उभा आहेत सनातनी
दलित बांधव भाव भक्तिनी
रक्त शोषक आहेत अग्रणी
तुझ्या घोषात काय लपल सांग मला ॥५॥
मला आहे तुझा विश्वास
साथ देशील स्वच्छ हातास
तसे भाविक वारकर्यास
मात्र लाथाड आता भ्रष्टाचार्याला ॥६॥
मला नको धन दौलत
माझे जीवन आहे खुशीत
फक्त फेक तुझ्या चरणी अर्पिला ॥७॥
N/A
References : N/A
Last Updated : February 02, 2023
TOP