स्वर अंतरंगाचे - होऊ नको विचलीत
काव्यसंग्रह - स्वर अंतरंगाचे
कवी - श्रीराम विठ्ठल गायकवाड
होऊ नको विचलीत थोडयाशा विरहाने ॥धृ०॥
निमेल हा अंध:कार
प्रकाशील तो बहर
नको हताश तोवर
हेची जीवनाचे सार
जैशी आहोरात्र ती धाडसाने निभावणें ॥१॥
जरी सुटेल तुफान
हलू पाहे देह भान
लोप पावे असा क्षण
आनंदील तुझे मन
तु मात्र भांबावून खचू नको निराशने ॥२॥
स्वाभाविक चमत्कार
येतील असे महापूर
थोडीशी हिम्मत धर
ओहोटी ही असणार
दैवाचा असा हा खेळ, तोंड दे साहासाने ॥३॥
येती संकटे जीवनी
जशी का घरा पाहुणी
कोणी जातील पळूनी
तर कोणी नशिबानी
येती जाती संकटे कर्म धर्म संयोगाने ॥४॥
मानवी देहाचे यंत्र
ना कुणाचा चाले मंत्र
सेवनाचे हुके तंत्र
सुरु बिघाडाचे सत्र
चिंता नको होईल दूर आत्मसंयमाने ॥५॥
N/A
References : N/A
Last Updated : January 30, 2023
TOP