स्वर अंतरंगाचे - सुमने
काव्यसंग्रह - स्वर अंतरंगाचे
कवी - श्रीराम विठ्ठल गायकवाड
सदाकाळ जे फुलवीत रहाते मना
जीवनी जपूया त्या अनमोल सुमना ॥ध्रृ॥
जे सृष्टीसौदर्याचे मोल
जिचा इतिहास विशाल
असाच घडत राहील
भविष्याचा अनंत काल
आनंद देई दु:खी आसवाच्या नयना ॥१॥
जी सृष्टीच्या छताची ज्योत
असा चंद्र शोभे नभात
वाटे श्रीकृष्णाची ताईत
शोभीवंत शुभकार्यात
आनंददायक नरवसलेल्या मना ॥२॥
तुम्ही प्रेमाची असे शान
जयाला स्वामीनीचा मान
स्वर्गातील परी समान
जिथे झुकते सोनं नाणं
संजीवनी मिळे कमनशीबी जीवना ॥३॥
जिच्या करा मनोमीलन
सान उच्चस्थाचा सन्मान
सज्जनाचे अभिनंदन
तसा निरोपाचाही मान
जिच्या गोड स्पर्शांने स्वर्ग दिसे ढेंगणा ॥४॥
जो अंतरंगी नवनीत
कधी बनती लोहागत
कुणा घाली वेडया पायात
तर कुणा पाश गळ्यात
तरी ही अविट गोडी सजीव जीवना ॥५॥
प्रेमा वंचीत त्याला प्रेम
खिन्न अशा मना विश्राम
पिडीत जिवाचे हे धाम
तसा प्रवासातील आराम
ईश्वराची ही देण लाभते काहीजणा ॥६॥
N/A
References : N/A
Last Updated : February 02, 2023
TOP