स्वर अंतरंगाचे - आण्णाभाऊ साठे
काव्यसंग्रह - स्वर अंतरंगाचे
कवी - श्रीराम विठ्ठल गायकवाड
वाजली अण्णाची शाहिरी
गालजी त्यांची कादंबरी
किर्ती पसरे दिगंतरी ॥ध्रृ॥
ज्या झरोक्याच्या झोपडीत
जिथे होती चुलीला भ्रांत
तेथे पेटुनी शाहिरी ज्योत
प्रकाशित झाली महाराष्ट्रात
विलीन होऊन सर्व थरात
गेली सारी मने उजळत
हीच ती लेखणी अवतारी
गाजली सारस्वत मंदिरी ॥१॥
मोठी उपजत बुध्दी असुनी
भिजल्या पापण्या आसवानी
विद्यार्जनार्थ सोसीले हसुनी
साधीले ध्येय अभ्यासुनी
दिला ना हात हाती कुणी
बुध्दीशिवाय या जीवनी
ध्येय तयाचे ज्वालापरी
जाऊनी भिडले नभांतरी ॥२॥
मायबोलीच्या शब्द सामर्थ्यान
सनातनी जना केले सुज्ञान
भाबडया दलित बांधवाला
त्यानी झोपेतुन जागा केला
खचलेल्या दु:खी हृदयाला
प्रेमाचा हातभार लाविला
डफाची थाप तनु शहारी
शब्दाचा भाव हृदया धरी ॥३॥
जी शब्दसुधा पाजणारी
प्रेमाची चादर घालणारी
कळ्याची फुले करणारी
रुढीच्या भिंती पाडणारी
मानवतेचे धडे देणारी
देशाची मान उंचावणारी
अशी उपकारी कादंबरी
संस्कारक्षम झाली भूवरी ॥४॥
उमले प्रतिभावंत सुमन
गंधीत करी दलित उदयान
वस्त्रसुती जरतारी तन
अंतरंग भव्य गुणवान
उदात्त हेतू साध्या बोलीतून
पहा त्यांच्या हृदयात जाऊन
अशी ही साहित्याची शिदोरी
खचित पोहचली घरोघरी ॥५॥
N/A
References : N/A
Last Updated : February 02, 2023
TOP