स्वर अंतरंगाचे - येणार आहे
काव्यसंग्रह - स्वर अंतरंगाचे
कवी - श्रीराम विठ्ठल गायकवाड
म्हणून आज जाऊन उद्या येणार आहे ॥ध्रृ॥
फळा फुलाना बहर येती
देह त्यागुनी सुगंध देती
निराश जीवाला फुलवुनी
जीवन परमार्थी लावती
सुमनाशी हितगुज मी करणार आहे ॥१॥
गोजीरी पाखरे आनंदाने
नाचुनी स्वागतगीत गाती
अंधाराला निरोप देऊनी
चराचराला नमस्कारती
माझे भव्य स्वागत, गीताने होणार आहे ॥२॥
जे स्वत: झिजुनी सुखविती
तेच मरुनी जगविती
असे कित्येक दीप जळती
जळुनी प्रकाशमय होती
भल्या बुर्याचा विचार मी करणार आहे ॥३॥
अंधाराचा फायदा घेऊनी
गरीब गाईला जखडती
त्यांच्या आस्मीतेचा ना विचार
दुधावर हक्क सांगती
असले काही अतिरेकी शोधणार आहे ॥४॥
जे तिमीराच्या साथीने घडे
तरीही मजपासून ना दडे
कळुनी पाय वाकडा पडे
अखेर त्याची राखच घडे
दुष्ट शक्तीचा संहार मी बघणार आहे ॥५॥
जे चोर लफंगे संधीसादू
तसे विघ्न संतोषी असती
हेची मला निरोप देऊनी
निशा राणीला हात जोडती
त्यांचे शेवटचे चित्र मी बघणार आहे ॥६॥
निजश्रमाच्या घामातुनी
जीवन जगविती झिजुनी परोपकार घेती वाहुनी
हितगुज करु त्यांच्या कानी
त्यांच्या सोबत राहून उद्या येणार आहे ॥७॥
N/A
References : N/A
Last Updated : February 01, 2023
TOP