स्वर अंतरंगाचे - थोराचा जयजयकार
काव्यसंग्रह - स्वर अंतरंगाचे
कवी - श्रीराम विठ्ठल गायकवाड
गरजू या जयजयकार थोराचा, गरजू या जय जयकार ॥धृ०॥
लेखकाचे अभिनव लेख
कविकल्पना असे मौलिक
नाटककाराचे प्रात्यक्षिक
हे बुध्दीवंत मार्गदर्शक
ज्ञानदानाचे असे हे द्वार ॥१॥
संताचे असे महान ऋण
सत्य धर्म हीच शिकवण
सेवा करा ईश देश जन
करु आपण खंबीर मन
जनजागृतीचे हे सागर ॥२॥
टिळकाचा बाणेंदारपणा
बापूजी भारतीयाचा कणा
जोतिबा झाले स्त्रियाचा राणा
नेहरु सांगे शांती जना
जातीधर्म भेद केला पार ॥३॥
शिवबाचे सत्य न्यायदान
बाबाची विद्वता स्वाभिमान
इंदिराजी दीनाचे भूषण
अनेक विराचे बलीदान
यांनी भारताला केले थोर ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : January 30, 2023
TOP