स्वर अंतरंगाचे - कोण संसार
काव्यसंग्रह - स्वर अंतरंगाचे
कवी - श्रीराम विठ्ठल गायकवाड
या प्रवासाचे वाटे, कोण संसार कसा थाटे ॥धृ०॥
जीवन प्रवासाच्या वाटेला
तनुपिडाचे खड्डे साथीला
कोण धावे देनी मदतीला
फक्त याचनाची संगतीला
हर एक सेवाधारकाला पैसा हवा वाटे ॥१॥
एकमेकातील वैमानस्य
तसे रक्तपात नि रहस्य
सत्य बने असत्याचे हास्य
काळा सोबत वाढे नैराश्य
वेळ साधू दलालास मात्र याची संधी वाटे ॥२॥
धनधान्याने भरो कोठार
बसुनी खाईन पिढयाभर
माझाच व्हावा सुखीसंसार
तसा त्या सोबत अधिकार
मालकी हक्क असणार्या सर्वाना असे वाटे ॥३॥
नित्य मिळावे काम मजला
जरी कष्ट हेची जीवनाला
फक्त त्याची साथ हवी मला
थारा नसे गुन्हा लबाडीला
असे हे बहुमोल विचार मजुरास वाटे ॥४॥
वर्षा कृपेने सृष्टी फुलावी
चराचराची चंगळ व्हावी
गोअमृताने पोटे भरावी
व्हावे हे जीवन सेवा भावी
असे महान विचार बालगोपालास वाटे ॥५॥
सर्वा लाभो आरोग्य संपदा
दीन दु:खी नकोच सर्वदा
नको तंटा दुही, मने द्विधा
दया प्रेमभाव वाढो सदा
होऊनी गेले महात्म्य, संत तसे मला वाटे ॥६॥
N/A
References : N/A
Last Updated : January 30, 2023
TOP