स्वर अंतरंगाचे - जीवनगान
काव्यसंग्रह - स्वर अंतरंगाचे
कवी - श्रीराम विठ्ठल गायकवाड
जेथे सृष्टी फुलते, तेथे जीवनगान झुलते ॥ध्रृ॥
नैसर्गिक हरित अशा नंदनवनात
बहरली अगणित अशी फळे जोमात
काही परिपक्व काहीची चाल त्या मार्गात
जे काहीं अपरिपक्व ते प्राक्तन शोधात
येथे सुख बहरते ॥१॥
स्वर्गाहून श्रेष्ठ सौंदर्य प्रधान वनात
बहुरंगाची बहुसुगंधाची सुमने त्यात
हे फुलुनी फुलविती जीवन शोभिवंत
पाकळ्याही येऊ पहाती त्यांचे जीवनात
आनंदी आनंद येथे ॥२॥
अन्न दात्या मातेच्या उदात्त उदरातून
अपरिमित जीवजंतूना मिळेजीवन
ह्या नंदनवनात सर्वांना जीवनदान
तनुठेविती निरोगी अन्न हे ब्रह्मजाण
हे जीवन सुखदाते ॥३॥
N/A
References : N/A
Last Updated : February 02, 2023
TOP