मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|श्रीराम विठ्ठल गायकवाड|

स्वर अंतरंगाचे - मासा

काव्यसंग्रह - स्वर अंतरंगाचे
कवी - श्रीराम विठ्ठल गायकवाड


का आलाशी सोडूनी त्या सागराला
ज्या सागरात सुधारस भरला
तू विसरला आनंदी जीवनाला
तुजसाठी जीव हा व्याकूळ झाला
तुझी जागा तू चुकलाशी
कसा वेडया येथे आलाशी
का सोडिले त्या सदनाशी ॥१॥

तो होता भव्यसा, तारण्या तूजला
तरीही त्यास कसा कृतघ्न झालात
खेळ तुला चंचलतेचा भोवला
म्हणूनी फसव्या डबक्यात आला
तू दिसता जलाशयात
सुखलो मी तव मनात
करु वाटे तुज संगत ॥२॥

मदत करावी तुज स्वच्छंद्याला
तुज काही देऊन, काही घेण्याला
बळी पडू नकोस, त्या फसव्याला
माझा अनुभव सांगे मी तुजला
तू होऊ नकोस अधाशी
हे चुकवितील तुजशी
मोह नडेल हा जीवाशी ॥३॥

तू सापडला कोण सोडी तुजला
जे टपले बगळे तुज खाण्याला
मग हुषारी ना पडे फायद्याला
ठरे मुर्खपणा मारक तुजला
किती सांगूनी तू फसला
बळी पडला तू मोहाला
अभिमन्युगत फसला ॥४॥

ज्यांनी अन्न म्हणूनी दिले रे विष
टाकला तुज त्यांनी हा मोहपाश
आता यातूनी बाहेर पडण्यास
आठवी तू त्या जन्मदात्यास ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : February 02, 2023

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP