स्वर अंतरंगाचे - जपावे
काव्यसंग्रह - स्वर अंतरंगाचे
कवी - श्रीराम विठ्ठल गायकवाड
चाललास चालत रहावे
जाता जाता अंतर्मूख व्हावे
बाकी प्रिय असले तरी
हृदयापेक्षा काळीज जपावे ॥१॥
बहु कष्ट करशी संसारात
सेवाची धर्म असे जीवनात
विसरु नये कर्तव्याला
ऊसापेक्षा जपावे साखरेला ॥२॥
आकाशात ढग जमा झाले
गर्जूनी आकाश दणाणले
फुका गर्जनेचा कशाला विचार
ढगापेक्षा जपा जीवन धार ॥३॥
जी दैवी शक्ती आपणा दिली
ज्ञानार्जनाचे मूळ अमोल
ज्ञान लाभले आपणा अपार
तरी ज्ञानापेक्षा जपावी अक्कल ॥४॥
निसर्गाच्या या नंदनवनात
निर्जलात तरु रुतुनी बसला
कोणी जलातिरी विसावला
शेवटी जपावे तरुपेक्षा फळाला ॥५॥
जिला लहानाची थोर केली
आता तीसुध्दा झाली माय
पोटची लेक असूनही प्रिय
जपावी दुधावरील साय ॥६॥
N/A
References : N/A
Last Updated : February 01, 2023
TOP