मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|गणेश पुराण|उपासना खंड|
अध्याय २३

उपासना खंड - अध्याय २३

श्री गणेश पुराणाचे पारायण केल्याने समाधान मिळते आणि जीवनातील सर्व पापे नष्ट होतात.


(दिंडी)

सोमकांताला च्यवनतात सांगे ।

चरित दक्षाचें रुचिर मला लागे ॥

असें वदला तो भीम गाधिजातें ।

वैश्य वृत्ताला सांग अतां मातें ॥१॥

(भुंजगप्रयात्)

वदे शाप तातासि बल्लाळसूत ।

अवस्था तशी पावली ती त्वरीत ॥

असें पाहतां घाबरे वैश्यकांता ।

करी शोक तो काय वर्णूंच आतां ॥२॥

पतीनें सुता बांधिलें वृक्षवल्लीं ।

असें ऐकुनी सत्वरें तेथ आली ॥

तिथें दीसलें एक मंदीर तीस ।

बसे सूत तेथें प्रभुपूजनास ॥३॥

तिला वाटली मिथ्य ती लोकवाणी ।

नृपा ती तया देतसे दोषवाणी ॥

असें वृत्त हें सांगुनीयां जनांनीं ।

मला आणिलें येथ त्यांना त्यजूनी ॥४॥

(गीति)

माझा बाळ कसा हा, पूजी भावें गजाननालागीं ।

ऐसें बोलुन त्यातें, प्रेमानें ती तयास आलिंगी ॥५॥

बल्लाळ बंधमुक्तहि, झाला दिधलें तयास मंदीर ।

राहे गणेश तेथें, भक्तिस्तव त्या समीप देव-वर ॥६॥

आणी बरोबरी जन, पाहे त्यासह सुतास इंदुमती ।

देखुन भक्ति तयांची, कौतुक करिते बहूत माता ती ॥७॥

माता सूतास वदे, बाळा चल तूं घरास आतां रे ।

कुदशा क्षणांत आली, पाहें चतुरा घराम्त त्यांस बरें ॥८॥

त्याच्या हीनदशेच्या, नाशासाठीं उपाय शोध तरी ।

हे लोक सांगती जरि, वृत्त खरें हें असेल जाण तरी ॥९॥

कोपूं नको तरी तुं, माझें आहे तुला असें म्हणणें ।

माझ्यासाठीं आतां, योग्य असे हें घरास तूं येणें ॥१०॥

मातेला बल्लाळें, म्हटलें भूपा कथी तुला हें तें ।

कोणाची माता नी, कोणाचा तो पिता वदे हो तें ॥११॥

माता-पिता असे हे, माझें आहे गजानन-प्रभु तो ।

माझा देह तयाला, अर्पण केला असे तुला कथितों ॥१२॥

गणपतिकृपेस होतां, लाधे मजला बहूतसें ज्ञान ।

ज्यानें देवां त्याजिलें, मोडियलें मंदिरास हें ज्ञान ॥१३॥

या गोष्टीचें फल हें, लाधे त्यांना असें असें जननी ।

माता-पित्यास आतां, जाणत नाहीं प्रभू असे दोनीं ॥१४॥

माझा मोह त्यजूनी जाईं आतां घरास परतुनी ।

धर्मा-चारां-परि तूं, पति-सेवा ही करीं दिवा-रजनीं ॥१५॥

(पृथ्वी)

वदे जननि त्यासही जरि खरा असे बाळ तो ।

प्रकार तरि तूं करीं मजवरी कृपा सांगतों ।

उपाय बहु संकटीं पडतसे तुझा तात हा ।

असें जननि भाषणा श्रवतसे वदे बाळ हा ॥१६॥

(स्त्रग्धरा)

या जन्मीं मुक्त नाहीं प्रभु-वर न करी सांगतो पातक्याची ।

तूं जेव्हां जन्मसी जो नृप-वर-कुलिं तूं पूढच्या जन्मिं साची ॥

माता होसी तयाची जनन पतित तो ऊदरीं नाम दक्ष ।

जन्मे तेव्हां तयाची उपजत गतिही जाणिजे पूर्वपक्ष ॥१७॥

(शालिनी)

पुत्रासाठीं भूपती यत्‍न सारे ।

केले ते ते व्यर्थ ते जात सारे ।

तेव्हां तो गे त्यासही तूजलागीं ।

कांतारीं तो हाकली याचलागीं ॥१८॥

श्री साधूंच्या आंग-वातेंच देहीं ।

होई तेव्हां जाणणें शुद्ध पाही ।

तेव्हां देई दर्शना देव-राव ।

सांगे तूंतें ठेवणें शुद्ध-भाव ॥१९॥

(साकी)

पुत्राचें हें भाकित ऐकुनी इंदुमती गहिंवरली ।

जाउनि तेव्हां पतिच्या ठायीं भक्ति-पथां अनुसरली ॥२०॥

धृ०॥सुन सुन वार्ता ही । भृगु कथिती भूप ही ।

ऐसें झालें नंतर तेव्हां विमान आलें तेथें ।

बल्लाळाला घेउन गेले देव-लोक हा जेथें ॥२१॥

N/A

References : N/A
Last Updated : October 15, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP