(साकी)
एके दिवशीं षडाननानें पुशिलें शिवास ऐक ।
अपुल्या वदनें बहू व्रतें मी ऐकें वृत्ता आणिक ॥१॥
धृ० ॥सुन सुन व्यासमुनी पावन हो कथनांनीं ।
परंतु माझें झालें नाहीं समाधान हें पूर्ण ॥२॥
आणिक कीर्ती त्रिभुवनिं व्हावी व्रतयोगें ती साची ।
कथणें मजला तव चरणीं ही विनती या सूताची ॥३॥
(स्त्रग्धरा)
ऐकें कार्तीकसूता गणपतिव्रत हें सांगतों तूज सोपें ।
नामें विख्यात आहे वरदचउथ ही आचरें नाश पापें ।
होती विघ्नें तशीं तीं अधन अशि दशा नीरसें या व्रतानें ।
लाधे सूतादि वित्ता सकल सुफलही भावना पूर्ण यानें ॥४॥
धर्मार्थादि व्रतानें सहज मिळुनियां मुक्त होती मुमुक्षू ।
पूर्वी मासीक नेमा करुनि कथन या सांगती हीमदाक्षू ।
केला कार्तीक याला सकल व्रत विधी श्रूत तो याच अर्थीं ।
केला कार्तीक यानें गणपति प्रभु हा साध्य हो या वरार्थी ॥५॥
(पृथ्वी)
गणेश मग पावले मयुर वाहनीं बैसले ।
वरार्थ प्रभु पातले वरहि माग हे बोलले ।
सइच्छवर दीधले त्वरित गुप्तही जाहले ।
सुभक्त "मयुरध्वजा" भिद असें तया पावलें ॥६॥
(भुजंगप्रयात्)
बरें योग्य झाला तदा कोर्तिकेय ।
करी युद्ध नेटें बहू कार्तिकेय ।
बहू वर्ष संख्या स्वयें युद्ध मोठें ।
वधी तारकासूर हें कार्य मोठें ॥७॥
बहू मोद झाला समस्तां सुरांसी ।
तसा मोद झाला समस्तां मुनींसी ।
पडे बंद कर्मास जेव्हां पुनः तीं ।
सुरु जाहलीं सर्व कर्में पुढें तीं ॥८॥
विधी सांगती व्यास मित्रास वार्ता ।
असे दैत्य मोठा सुरांसीच हर्ता ।
तिसाधीक कोटी त्रीणिही सुरांची ।
स्थिती जाहली ऐकणें यापुढेंची ॥९॥
असा दैत्य त्याला वधी कार्तिकेय ।
व्रताचा असे हा परीणाम काय ।
बघूनी मुनी मानसीं हा विचार ।
सुरेंद्राहि देवांमधें पूज्य वीर ॥१०॥
(गीति)
घूस्टण ईश्वर जेथें, पावे वर कार्तिकेय गणपतिचा ।
लक्ष-विनायक तेथें, होता नृपती सुवंश चेलीचा ॥११॥
तेथें समीप होतें स्थापित हें ’लक्षनगर’ राजाचें ।
सांगे विधी मुनीला, वृत्त असे हें षडानन प्रभुचें ॥१२॥