मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|गणेश पुराण|उपासना खंड|
अध्याय ३२

उपासना खंड - अध्याय ३२

श्री गणेश पुराणाचे पारायण केल्याने समाधान मिळते आणि जीवनातील सर्व पापे नष्ट होतात.


 (इंद्रवज्रा)

रुक्मांगदा नारद सांगतात । देठांत बैसे सुरभूप गुप्त ।

ऐसें मला हें समजे नृपा तें । जाऊन सांगें सकलां सुरांतें ॥१॥

ऐकून वार्ता करिती बिचारा । ते पातले गौतम त्या अगारा ।

वंदोन त्यांना म्हणतात देव । सामर्थ्य वर्णूं शकती न देव ॥२॥

मोठेपणा काय हिमालयाचा । मेघांतुनी ज्या पडल्या जलाचा ।

भूमीवरीच्या सिकताकणांचा । वर्णावया त्या शकती न वाचा ॥३॥

किंवा हरीच्या गुणवर्णनासी । सामर्थ्य नाहीं रसनेंद्रियासी ।

तैसेंच आहे अपुलें चरित्र । ऋषींस सामर्थ्य असे अपार ॥४॥

प्रभातकालीं कण पेरितात । माध्यान्हकालीं कण काढितात ।

समुद्र सारे मुनीं आचमीले । निर्मीत इंद्रा मुनि वालखिल्यें ॥५॥

(गीति)

अपुलें दर्शन किंवा, भाषण करितें समस्त पाप धुणी ।

इंद्रासाठीं आलों, पुरवा इच्छा म्हणोन येथ झणीं ॥६॥

ऐकुन गौतममुनि त्या, वदती देवांस काय तें परिसा ।

परिसा चरित्र आतां, सुर-भूपति हीन खापरापरिसा ॥७॥

कपटी दुर्जन शठही, अविचारी हा करी महादोष ।

तपसा गजाननाची, करितां तो होतसेच निर्दोष ॥८॥

प्राप्ती गजाननाची, व्हावी म्हणुनी तुम्हांस मंत्र कथी ।

उपदेशावा तुम्हीं, जप करितां उद्धरेल याच पथीं ॥९॥

शाप नसे मम खोटा, कालत्रयिंही कधीं न होणार ।

भग्नें जाउन तेथें अक्षांनीं देह पूर्ण होणार ॥१०॥

नंतर इंद्राला तें, नाम असें ठेविती सहस्त्राक्षू ।

ऐकुन मुदीत सुर हे, वंदिति गौतममुनीस सह-चक्षू ॥११॥

देवांमध्यें चपटीं, वाटोळीं धवल तीस द्वय अंगीं ।

भोकें प्रचूर असती, शीलेला नाम देति चक्रांगी ॥१२॥

देवांमध्यें ठेविति, देव पुरंधर म्हणोन पूजन तें ।

करिती पूजन त्याचें, गंधाविण तंडुलेंच अर्पुन तें ॥१३॥

बारा तेरा गीती, अर्वाचिन त्या जनांस समजाया ।

केल्या मयूरसुतें, ग्रंथीं नाहीं कथेंत सांगाया ॥१४॥

N/A

References : N/A
Last Updated : October 15, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP