मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|गणेश पुराण|उपासना खंड|
अध्याय ३७

उपासना खंड - अध्याय ३७

श्री गणेश पुराणाचे पारायण केल्याने समाधान मिळते आणि जीवनातील सर्व पापे नष्ट होतात.


 (दिंडी)

तपासाठीं कांतार एक पाहे ।

नाम पुष्पक हें सार्थ असें आहे ।

तया कांतारीं एक मुनी होते ।

अधीं प्रणिलें कीं गृत्समदें त्यातें ॥१॥

तपासाठी अंगुष्ठ एक मात्र ।

उभा राहे नासाग्रिं दृष्टि मात्र ।

देइ नंतर तो दमन इंद्रियांचें ।

करी नियमन हें वायुकरिं साचें ॥२॥

करी तपसा ही एकाग्रमनें व्यासा ।

जपे गणपतिचा मंत्रविधी ऐसा ।

बहुत वरुषें तो तपा करी तेथें ।

उघडि नयनांसी वन्हि निघे तेथें ॥३॥

तीन लोकांसी पीडितसे जेव्हां ।

पडे चिंता ती अमर-वरा तेव्हां ।

घेइ कवनाचें स्थान अशी ती ही ।

कथा ऐकावी सुरस अशी ती ही ॥४॥

पुन्हां तपसा ती गृत्समदें केली ।

गलित पर्णें ही भक्षुनीच केली ।

असा निश्चय हा पूर्ण मनें त्याचा ।

नसे आळसही येतसे तपाचा ॥५॥

बहुत वरुषें ही होत तपश्चर्या ।

अशी दारुण ही पाहुनी तपश्चर्या ।

मुदित होऊन ती प्रकट तिथें मूर्ती ।

वरा देउन ती करित हेतुपूर्ती ॥६॥

असें ऐकुनियां गृत्समदें देवा ।

करी साष्टांगें प्रणति वदे भावां ।

लक्ष चौर्‍यांशीं भ्रमण करी योनी ।

जन्म मानव हा त्यांत विप्रयोनी ॥७॥

तयांमध्येंही श्रेष्ठ असे ज्ञानी ।

तयांपेक्षांही थोर अनुष्ठानी ।

तयांपेक्षांही ब्रह्म-विद श्रेष्ठ ।

मला द्यावें तें ज्ञान असे इष्ट ॥८॥

मला आतां कीं भक्त त्यांत योजी ।

पूज्य व्हावें मी मनुज देवमाजी ।

अतां पुष्पक हें कांतार पुनित व्हावें ।

सिद्धि-दायक हें भक्त-जनां व्हावें ॥९॥

इथें भक्तिस्तव वास करा देवा ।

इथें भक्तांचा हेतु पूर्ण व्हावा ।

असे मागें तो भक्त-राज योगी ।

देत सत्वर तो देव वरा भोगी ॥१०॥

(गीति)

गणपति म्हणे तुला मीं, दिधलें आहे द्विजत्व हें आतां ।

गणती मुनी तुला ही, वेदज्ञांमाजि मुख्य ते आतां ॥११॥

ज्या मंत्रानें मजला, तोषविलें त्या जपून मंत्रास ।

होशी ऋषी म्हणूनी, त्या आधीं नाम घेति हें खास ॥१२॥

कारण मंत्र तसाची, जपतां नसते तयास ती सिद्धी ।

यास्तव दैवत छंदा, आणिक ऋषिही स्मरोन ये सिद्धी ॥१३॥

तुजला अजिंक्य ऐसा, होइल सुत तो जगांत विख्यात ।

एका शिवाविना तो, वध्य नसे देतसे वरा ख्यात ॥१४॥

या विपिनासी वदती, पुष्पक हें नाम आद्य युग-कालीं ।

त्रेतायुगांत नामें, वदती मणिपूर हें तया कालीं ॥१५॥

द्वापारीं जन सारे, मानक हें नाम पुष्पका देती ।

चालू युगांत याला, भद्रक हें नाम लोक या वदती ॥१६॥

क्षेत्रांमाजी येथें, करिती जे स्नान दान हीं नित्य ।

इच्छित मनोरथांसी, गृत्समदा पावतील ते त्वरित ॥१७॥

देउन वरास तेथुन, गेले स्वपुरीं गजानन प्रभुतें ।

इकडे गृत्समदानें, निर्मियलें भव्य नव्य मंदिर तें ॥१८॥

त्या मंदिरांत त्यानें, स्थापियली मूर्ति एक उत्तमशी ।

वरद-विनायक ऐसे, ठेवियलें नाम त्या तपोराशी ॥१९॥

विधिनें व्यासा कथिलें, भृगु कथिती सोमकांत-भूपास ।

प्राकृत कवनें करुनी, अर्पियलीं त्या विनायक प्रभुस ॥२०॥

N/A

References : N/A
Last Updated : October 15, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP