मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|गणेश पुराण|उपासना खंड|
अध्याय ४५

उपासना खंड - अध्याय ४५

श्री गणेश पुराणाचे पारायण केल्याने समाधान मिळते आणि जीवनातील सर्व पापे नष्ट होतात.


(पृथ्वी)

मलाच नमितां शिरें पुनित जाहलीं पांच हीं ।

स्तवोन तुजला मुखें पुनित जाहलीं पांच हीं ॥

सुभूत रचुनी तसे विषय पांचही निर्मिले ।

सुरादि सकलां चराचर जगासहि निर्मिले ॥१॥

रजोगुण असे जगा रुजविलें तुझें कृत्य कीं ।

धरुन गुण सत्त्वही करिसि पालना तूंच कीं ॥

तमोगुण तुझा असे करित नाश हा साच कीं ।

असें करुन तूं असे पृथक एकटा मुख्य कीं ॥

म्हणून वदती तुला सकल साक्षि ते जाणते ।

गणांस धनि तूं असे गणपती तुझें नाम तें ॥

असा स्तव करी सदाशिव तिथें प्रभू ऐकुनी ।

गणेश वदती तया स्मरसि तूं मला कीं मनी ॥३॥

त्वरें करुन मी तिथें झडकरी शिवा येतसें ।

हरीन तव संकटा सतत ती वरा देतसें ॥

मदीय बिज-मंत्र हा जपुन तूं शरां योजुनी ।

शरेंच पुरं भग्न तीं सहज होति शंभो तिनी ॥४॥

त्रिपूर मग भस्म तूं करिसि देत ऐसा वर ।

वरास मिळतां बहू मुदितसा असे शंकर ॥

वरास मिळतां तिथें भुवन एक तें बांधुनी ।

करुन यजनां शिवें गणपती तिथें स्थापुनी ॥५॥

समीप वसवी मणीपुर असें लघू क्षेत्र तें ।

शिवासह सुरांस दे गणपती तिथें भेट ते ॥

गणेश मग गुप्त ते सकल साक्षिनें जाहले ।

शिवासह सुरीं गजानन तदा असे पाहिले ॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : October 15, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP