मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|गणेश पुराण|उपासना खंड|
अध्याय ४०

उपासना खंड - अध्याय ४०

श्री गणेश पुराणाचे पारायण केल्याने समाधान मिळते आणि जीवनातील सर्व पापे नष्ट होतात.


(गीति)

यापरि शक्रा त्रिपुरें, च्युत केलें राज्य घेतलें त्यानें ।

कळलें वृत्त विधीला, लपला तो अंबुजांत भीतीनें ॥१॥

विष्णूला वृत्त कळे, लपला तो क्षीरसागरामाजी ।

ऐकुन ब्रह्मा विष्णू, त्यजिति स्थानें स्वयेंच ते राजी ॥२॥

निर्मी त्रिपूर तेव्हां, मानसपुत्रांस आपुल्या काजीं ।

चंद प्रचंड योजी, उभयांचे रिक्त लोक त्यामाजी ॥३॥

त्रिपुरें पराक्रमानें, बाहूंनीं हलविलाच कैलास ।

भ्याली असे भवानी, मोदें शिव दे वरास कीं त्यास ॥४॥

वर देयिजे तयाला, कैलासाचें प्रमूख तें स्थान ।

जाई निघून तेथुन, मंदारीं पाहिलें असे स्थान ॥५॥

त्रिपूर प्रेषित नायक, पृथ्वीवरि भीमकाय काय करी ।

जिंकुन भूपति सारे, त्यापसुन घेतसेहि कर भारी ॥६॥

अग्नी-कुंडें फोडून, मोडुन टाकी मुनीगृहें असुर ।

कारागृहीं मुनींना, ठेवुन त्यांना छळीतसे फार ॥७॥

देवांचीं कृत्यें हीं, करवितसे बंद दुश्ट अनिवार्यें ।

स्वाहा स्वधादि वेदां, हौत्रांना करवि बंदही कार्यें ॥८॥

यास्तव वेदध्वनि तो, न पडे श्रवनीं घडे अनाचार ।

करिती राज्य असें हे, पृथ्वीमाजी असूर संचार ॥९॥

पाताळ-नायकानें, जिंकियले सर्व नाग शेषादी ।

त्यांच्या सुंदर कांता, हिरुन घेई अमूल्य रत्‍नादी ॥१०॥

त्रिपुरा अर्पण केलें, हरिलें जें सर्व वज्रदंष्ट्रानें ।

त्रिभुवनिं त्रिपूर करितो, राज्य असें हें गणेश वरदानें ॥११॥

देव पराजित झाले, यास्तव करिती वधार्थ त्रिपुराच्या ।

होतो विचार जों तों, नारद आले समीप देवांच्या ॥१२॥

(हरिणी)

विधि-सुत तदा बोले देवां त्रिपूर करी तप ।

बहुत वरुषें त्यानें केला गणेश असा जप ।

म्हणुन बल हें त्याला आलें गणेश वरां-मधीं ।

गणपति वदे त्याला तेव्हां रणीं शिच तो वधी ॥१३॥

म्हणुन सुर हो तुम्ही आतां गणेश अधीं स्मरा ।

विधि-सुत तया देई मंत्रां कथी विधि त्या सुरां ।

सकल सुर ते श्रद्धेनें कीं तपा करुं लागले ।

गणपति तपा पाहे तेव्हां प्रसन्न उदीतले ॥१४॥

(शार्दूलविक्रीडित)

देवांनीं स्तविले गणेश मग ते स्तोत्रें करुनी असे ।

जे कोणी म्हणती त्रिकाल नियमें त्यांना यशस्वी असे ।

या स्तोत्रास असे वरप्रद असा त्या मंगलाचा वर ।

रक्षीं संकटिं मी म्हणून म्हणणें स्तोत्रास कीं सत्वर ॥१५॥

(गीति)

या स्तोत्राला आहे, संकट नाशन प्रथीतसें नाम ।

पठतां नित्य तयाला, आनंदें लाभतें सुखें धाम ॥१६॥

N/A

References : N/A
Last Updated : October 15, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP