मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|गणेश पुराण|उपासना खंड|
अध्याय ७४

उपासना खंड - अध्याय ७४

श्री गणेश पुराणाचे पारायण केल्याने समाधान मिळते आणि जीवनातील सर्व पापे नष्ट होतात.


(पृथ्वी)

कथा सुरस इंद्र ही कथित शूरसेनास कीं ।

करी तप तिथें सुनिश्चय असे अती भक्ति कीं ।

करी उदरपूर्ति तो सतत वायु भक्षून कीं ।

करी तप रवी-मितें वरुष तेंहि दारुण कीं ॥१॥

असें तप बघे गजानन मनीं बहू तोषला ।

तडाग कुटिसंनिधीं मधुनियां पुढें पातला ।

तयास वदला मुला विपिन घोर हें पाहुनी ।

इथें सतत अतां वरदसिद्ध मी जाहलों ।

अभीष्ट वर मागणें प्रभु वदे तुला पावलों ।

गणेश वचसा अशी श्रवणिं ऐकिली इष्ट ती ।

म्हणे प्रभुवरा सदा तव पदीं जडो मन्मती ॥३॥

अणीक दुसरी मला रुचत कीं नसे देणगी ।

परंतु जनका करा मुदित देउनी देणगी ।

करा तनुहि साजिरी बघुनियां मनोहारिणी ।

अशी विनति ऐकुनी प्रभु करी तनू सांधणी ॥४॥

(गीति)

श्रीमद्गणेशदेवें, धरिलें लघुसें स्वरुप तत्काळ ।

केला प्रवेश शरिरीं, तेजस्वी कार्तवीर्य भूपाळ ॥५॥

बाहूपासून त्याला, फुटते झाले सहस्त्र ते हात ।

पायहि फुटले दोनी, ठाके तेव्हां पहातसे तात ॥६॥

आनंदाच्या योगें, गर्जे तेव्हां जगास हो काय ।

पांचशता-मित-बाणा, सोडी म्हणुनी तयास भय अमुप ॥

तो कार्तवीर्य ’पावे सहस्त्रार्जुन’ हें प्रसिद्ध नाम असें ।

देवांनीं वर देउनि, बक्षिस दिधले पदार्थ पुष्कळसे ॥८॥

सहस्त्रार्जुन वसवी मग, सुंदर मंदिर वनांत तें एक ।

निर्मी प्रवाळ मूर्ती, स्थापी त्या मंदिरांत हें ऐक ॥९॥

स्थापी प्रवालगणपति, मूर्तीसी नाम पुत्र कृतवीर्य ।

अद्वितिय रुप पाहुनि, चकित असे जाहले हि जन सर्व ॥१०॥

भूभार मस्तकावरि, धरण्यासी शेष याचि बल खासें ।

यास्तव ’धरणीधर’ हें दिधलें दुसरें तयास नाम असें ॥११॥

हे शूरसेन भूपा, सहस्त्रार्जुन रावणास सर्वज्ञ ।

करिता झाला ऐकें, संकष्टीचें महात्म्य तूं सुज्ञ ॥१२॥

व्रतपुण्या मला कोणीं, दिधलें तर हें विमान हालेल ।

ऐकुन भूप म्हणाला, सुरवर बोला यशस्वि होशील ॥१३॥

व्रत मी करीन यास्तव, तें देई पुण्य हो करी साचें ।

कार्यार्थ पुण्य लाभा, असलें कांहीं मदीय दैवींचें ॥१४॥

N/A

References : N/A
Last Updated : October 15, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP