मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|गणेश पुराण|उपासना खंड|
अध्याय ७८

उपासना खंड - अध्याय ७८

श्री गणेश पुराणाचे पारायण केल्याने समाधान मिळते आणि जीवनातील सर्व पापे नष्ट होतात.

 


(गीति)

व्यास म्हणे त्या विधिला, अणखी कोणी गजानन प्रभुची ।

भक्ती करुन त्यानें, आकळिला तो वदे कथा त्याची ॥१॥

पूर्वी गजाननाची, भक्ती केली असे परशुरामें ।

व्रत हें केलें त्यानें, कथितों कथना सुलक्ष दे प्रेमें ॥२॥

श्वेतद्वीपामाजी, जमदग्नी हा महर्षि तप धामीं ।

राहे पराक्रमी बहु, भीतीतें देव सर्व त्या नामीं ॥३॥

होता त्रिकाळ जाणत, यास्तव ख्याती प्रथीत ती होती ।

मुनिपत्‍नि रेणुका ही, सुंदर साध्वी सुपूज्य ती होती ॥४॥

उदरीं जन्म तियेच्या, विष्णू घेती प्रसिद्ध अवतार ।

परशूराम म्हणूनी, प्रकटे तेथें पराक्रमी थोर ॥५॥

जननी जनक तयांचा, भक्तहि होता प्रसिद्ध मुनि व्यासां ।

जनकापाशीं त्यानें, वेदाध्ययना करुन हो गुरुसा ॥६॥

नंतर तपास गेला, नैमिष नामें अरण्य जें त्यांत ।

सहस्त्रार्जुन मृगयेसी, करुनी आला तिथें अकस्मात ॥७॥

सैन्यांतिल निवडक ते, अधिकारी घेउनी तिथें आला ।

नृपती देखुन त्यातें, मुनि भावें त्यास आदरें पुजिला ॥८॥

जमदग्नि त्यास बोले, पुष्कळ कीर्ती तुझी मला कळली ।

यास्तव भेटीपासुन, मुदित अशी भावना मशीं झाली ॥९॥

येथें आलां म्हणुनी, भोजन करणें तुम्हां असे उचित ।

ऐशी इच्छा आहे, ऐकुन नृपती तया असें वदत ॥१०॥

भोजनकाल असे हा, भोजन करणें अम्हां असे योग्य ।

सेना अपार आहे, तरतुद झाल्याविना नसे योग्य ॥११॥

मुनिवर दर्शनाचा, लाभ अम्हां जाहला असे थोर ।

म्हणुनी कृतार्थ आम्ही, झालों हें भाग्य आमुचें थोर ॥१२॥

मुनि भूपाला म्हणती, अपार सेना जरी असे तुमची ।

चिंता न करीं भूपा, भोजननृप्ती करीन मी तुमची ॥१३॥

स्नान करुनियां यावें, तोंवरि भोजन तयार होईल ।

पुढती कथानकाला, ऐकें व्यासा सुरंग येईल ॥१४॥

N/A

References : N/A
Last Updated : October 15, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP