मालती, जाई, केतकी, मोगरी, अशोक, चंपक, पुन्नाग, बकुल, कमल, कुंद, कण्हेर, पाटला, तगर ही पुष्पे व इतर सुगंधी पुष्पे ही विष्णूस प्रिय आहेत. अपामार्ग (आघाडा), माका, खदिर, शमी, दूर्वा, दवणा, बिल्व व तुळशी यांची पत्रे उत्तरोत्तर एकापेक्षा एक अधिक प्रिय आहेत. जाईच्या सहस्त्र पुष्पांची माला विष्णूस अर्पण केली असता कल्पकोटि सहस्त्र वर्षेपर्यंत विष्णुपुरी वास होतो. आंब्याच्या मोहराने पूजा केली असता गोकोटिदानाचे फल मिळते.