शुभ फलदायक व अशुभ फलदायक असे स्वप्नांचे दोन प्रकार आहेत. त्यापैकी, सामान्यतः शुभफल स्वप्न सांगतो. नदी, समुद्र तरणे, आकाशात गमन, ग्रह, नक्षत्रे, सूर्यमंडल व चंद्रमंडल यांचे दर्शन; ग्रह, देवालय अथवा राजवाडा यांच्या शिखरावर आरोहण, मद्यपान मज्जा व मांसभक्षण, कृमि, विष्ठा यांचा अंगास लेप, रुधिराचे स्नान, दहीभाताचे भोजन व श्वेतवस्त्र, श्वेतग्रंथ, राने, अलंकार ही स्वप्नात पाहिली असता कार्यसिद्धी होईल. देवता, विप्र, राजा, उत्तम अलंकार धारण केलेल्या स्त्रिया, बैल, हत्ती, पर्वत, औदुबर वृक्ष व फलयुक्त वृक्ष यांवर आरोहण, आरसा, मांस व पुष्पे यांची प्राप्ती, श्वेत पुष्पे व श्वेत वस्त्रे धारण करणारे स्वप्नात पाहिले असता पाहणारास द्रव्यलाभ होईल व रोग दूर होईल.