विवाहाची देवता अग्नि असल्यामुळे विवाहांगभूत पुण्याहवाचनादि कर्माच्या अंती "कर्मांगदेवता अग्निः प्रीयतां" असे म्हणावे. औपासनाच्या देवता, अग्नि, सूर्य व प्रजापति ह्या होत. स्थालीपाकाची देवता अग्नि, गर्भाधानाची ब्रह्मा, पुंसवनसंस्काराची प्रजापति, सीमंतोन्नयनाची धाता, जातकर्माची मृत्युल नामकर्म, निष्क्रमण व अन्नप्राशन यांची देवता सविता, चौलसंस्काराची केशिन, उपनयनाच्या देवता, इंद्र, श्रद्धा व मेधा, अंती सुश्रवा देवता, पुनरुपनयनाची देवता अग्नि, समावर्तनाची इंद्र, उपाकर्म व महास्नानादि व्रतांची देवता सविता, वास्तु होमाची देवता वास्तोष्पति, त्यांच्या अंती प्रजापति, आग्रयणाची आग्रयण, सर्पबलीच्या देवता सर्प, तडागादिकांची देवता वरुण, ग्रहयज्ञाच्या देवता आदित्यादि नवग्रह, कूश्मांड होम, चांद्रायण व अग्न्याधान यांच्या अग्न्यादि देवता, अग्निष्टोमाची देवता अग्नि, व इतर इष्ट कर्मांची देवता प्रजापति ही होय.