देशकालाचा उच्चार करून
"करिश्यमाणगायत्रीपुरश्चरणेऽधिकारसिद्ध्यर्थंकृच्छ्रत्रयममुकप्रत्याम्नायेनाहमाचरिष्ये"
असा संकल्प करावा व होमादिकांचा जो प्रत्याम्नायविधि त्याने तितके कृछ्र आचरण करून
"अमुकशर्मणोममगायत्रीपुरश्चरणेऽनेनेकृच्छ्रत्रयानुष्ठानेनाधिकारसिद्धिरस्तु"
असे ब्राह्मणांस म्हणावे. 'अधिकार सिद्धिरस्तु' असे ब्राह्मणाने म्हणावे? नंतर
"पाकरिष्यमाण पुरश्चरणांगत्वेनविहित गायत्री जपादि करिष्ये."
असा संकल्प करून स्वतः किंवा ब्राह्मणद्वारा जप करावा. तो असा- प्रणव व्याह्रति यांनी युक्त गायत्रीचा दहाहजार १०००० जप करून "आपोहिष्ठा०" हे सूक्त "एतोन्विंद्र" या तिन ऋचा "ऋतंच०" हे सूक्त "स्वस्तिनो०" इत्यादि स्वतिमति ऋचा व स्वादिष्ट्या इत्यादि पावमानी ऋचा या सर्व ऋचांचा प्रत्येक ऋचेचा दहा वेळ याप्रमाणे स्वतः किंवा दुसर्याकडून जप करवून
"तत्सवितुरित्यस्याचार्यमृषिंविश्वामित्रंतर्पयामि गायत्रीछन्दस्त० सवितारंदेवतां तर्पयामि"
असे तर्पण करून रुद्रास नमस्कार करावा; व "कद्रुद्राय०" इत्यादि रुद्रसूक्तांचा जप करावा. दुसर्या दिवशी देशकालाचा उच्चार केल्यावर
"ममसकलपापक्षयद्वाराश्रीपरमेश्वरप्रीत्यर्थंचतुर्विंशतिलक्षात्मकगायत्रीपुरश्चरणंस्वयंविप्रद्वारावाकरिष्ये तदङ्गत्वेनस्वस्तिवाचनंमातृकापूजनंनादीश्राद्धं विप्रद्वाराजपेजपकर्तृवरणंचकरिष्ये"
असा संकल्प करावा. ऋत्विक ह्यास संकल्प करणे असल्यास
"अमुक शर्मणो यजमानस्य सकल पापक्षयेत्यादि० यजमाननुज्ञया करिष्ये"
याप्रमाणे पूर्वीही संकल्प करावा. नांदीश्राद्धाच्या शेवटी "सविता प्रीयतां०" असे म्हणावे
"गायत्रीपुरश्चरणेजपकर्तारंत्वांवृणे"
असे वाक्य म्हणून एकेका ब्राह्मणास वरावे व त्याची वस्त्रादिकांनी पूजा करावी.