आरंभी ध्रुव, आकाशगंगा, स्वतःच्या नासाचा अग्रभाग व चंद्रावरील डाग ज्याचे आयुष्य हीन झाले असेल त्यास दिसत नाही; ज्याची पावले धूळ, चिखल इत्यादिकांत तुटकी दिसतील किंवा स्नान केले असता सर्व अवयव ओले असताही ज्याचे मुख मात्र अगोदर शुष्क होते, सूर्यादिक दोन दिसतात, सर्व वृक्ष सुवर्णासारखे दिसू लागतात; आपली पावले चिखलात दिसत नाहीत; दोन्ही बोटे कानात घातली असता आत होणारा आवाज ऐकु येत नाही; जलादिकात आपले प्रतिबंब पहाताना शीर दिसत नाही, आपल्या छायेत छिद्रे दिसू लागतात, इत्यादि लक्षणे दिसू लागली तर तो पुरुष फार दिवस जगणार नाही.